मुक्त

मी शब्दांना वाचत होते
तू माणसांना वेचून वाचत होतास
मी  वेचत होते फुले
तू सुगंध वाटत होतास
मी शब्दांना अर्थ शोधत होते
तू शब्द सार्थ लावत होतास
मी स्वतःला रितं करीत होते
अन तू मुक्त होत होतास............. ..
                            P.S.AarchU


Comments