तुझे माझे अनाम नाते, अलगूज सावरावे
प्रितीत मी तुझ्या, बेधूंद वावरावे
छबी तुझी तेव्हाची, स्वप्नात मी रंगवावी
होवून तुझी जोगन, रात्रही जागवावी
लटक्या या खेळामध्ये, मी नित्य गुरफटावे
सारून दूर भान, तुज अंतरी साठवावे
द्यावे तुज सुख सारे, अश्रूंना मी सांभाळावे
त्या दैवगाठी जाणून, रेशमासह मी गोंजरावे
समर्पून मीपन माझे, तुजपुढे नित्य रिते व्हावे झुगारून पाश काळाचे, स्त्री सत्व उधळावे.........
P.S.AarchU
Comments